टेंबे गणपतीच्या स्थापना मिरवणुकीने वेधले माजलगावकरांचे लक्ष
बीड, 23 सप्टेंबर, (हिं.स.)। माजलगाव शहरातील ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या टेंबे गणपतीची मंगळवारी विधिवत पूजा-अर्चा करून स्थापना करण्यात आली. गणरायाच्या स्वागतासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. पारंपरिक वाद्यांचा गजर, गणराय
टेंबे गणपती


बीड, 23 सप्टेंबर, (हिं.स.)। माजलगाव शहरातील ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या टेंबे गणपतीची मंगळवारी विधिवत पूजा-अर्चा करून स्थापना करण्यात आली. गणरायाच्या स्वागतासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. पारंपरिक वाद्यांचा गजर, गणरायाचा जयघोष आणि भक्तिमय वातावरणात मिरवणूक उत्साहात पार पडली.

टेंबे गणपतीला शहराच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेत विशेष महत्त्व आहे. दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त या गणपतीची विधिवत स्थापना केली जाते. यंदाही गणेशभक्तांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत गणरायाचे स्वागत केले. मिरवणुकीदरम्यान नागरिकांची गर्दी झाली होती. ब्रम्हवृदानी मंत्रोचारने गणपतीची विधिवत पूजा, आरती व धार्मिक कार्यक्रम पार पाडले. गणेशोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष अनंतशास्त्री जोशी यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande