
लातूर, 23 सप्टेंबर (हिं.स.) : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी एका शेतकऱ्याने आपल्या अडचणी आणि व्यथा मांडताना भावुक होत अश्रू अनावर झाले. त्याने मुख्यमंत्र्यांना मिठी मारून आपल्या भावना व्यक्त केल्या.
शेतकऱ्याची व्यथा ऐकल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्याला जवळ घेत धीर दिला आणि त्याचे सांत्वन केले. दुष्काळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेताना त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.लातूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींची माहिती यावेळी घेण्यात आली. संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.शेतकऱ्याने भावुक होत मुख्यमंत्र्यांना मिठी मारल्याचा प्रसंग यावेळी उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारा ठरला.
--------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis