
अमरावती, 23 सप्टेंबर (हिं.स.)। पूर्णानगर येथील गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाद्य वाजवण्यास पोलिसांनी बंदी घातल्याची माहिती दिशाभूल करणारी असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पूर्णानगर येथील गणेश मंडळाने पाच वेगवेगळ्या प्रकारच्या वाद्यांसह डीजे/धुमालसाठी परवानगी मागितली होती. त्यापैकी ध्वनीवर्धक तसेच वाद्यांचा वापर शासनाने निर्धारित केलेल्या अनुमत ध्वनीमर्यादेत करण्यास पोलिसांकडून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे ‘विसर्जनावेळी वाद्य वाजवण्यास पोलिसांनी पूर्णपणे बंदी घातली’ असा संदेश चुकीचा व दिशाभूल करणारा असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सोशल मीडियावर किंवा इतर माध्यमांतून प्रसारित होणाऱ्या अफवा व अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही शंका किंवा संभ्रम असल्यास अधिकृत माहितीसाठी स्थानिक पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी