बीड - रेल्वेसाठी शहरांतर्गत बससेवा सुरू करण्याची निवेदनाद्वारे मागणी
बीड, 23 सप्टेंबर (हिं.स.)। बीड-अहिल्यानगर-पुणे रेल्वेमार्गावर १७ सप्टेंबर रोजी प्रथमच रेल्वे धावली असून, २२ सप्टेंबरपासून दररोज बीड-पुणे आणि पुणे-बीड रेल्वेसेवा सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी बीड शहरां
निवेदन


बीड, 23 सप्टेंबर (हिं.स.)। बीड-अहिल्यानगर-पुणे रेल्वेमार्गावर १७ सप्टेंबर रोजी प्रथमच रेल्वे धावली असून, २२ सप्टेंबरपासून दररोज बीड-पुणे आणि पुणे-बीड रेल्वेसेवा सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेने प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी बीड शहरांतर्गत बससेवा सुरू करावी, अशी मागणी एस. एम. युसूफ आणि रमेशराव गंगाधरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

रेल्वे स्थानक शहरातील अनेक भागांपासून दूर असल्याने

प्रवाशांना तेथे जाण्यासाठी अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सहन करावा लागू शकतो. त्यामुळे शासकीय तंत्रनिकेतन, एमआयडीसी, आनंदवाडी, करपरा नदी आणि चहऱ्हाटा फाटा चौक या पाच ठिकाणांहून रेल्वे स्थानकापर्यंत बससेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. या बससेवेसाठी पूर्ण तिकीट आकारावे, मात्र इतर एसटी बसप्रमाणे सवलती देऊ नयेत, अशी सूचनाही निवेदनात करण्यात आली आहे. सेवा आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य राहून प्रवाशांना वेळेवर बस उपलब्ध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande