छ. संभाजीनगर - अवैध मुरूम वाहतूक करणारा टिप्पर व रेती उत्खनन करणारे जेसीबी जप्त
छत्रपती संभाजीनगर, 23 सप्टेंबर (हिं.स.)। जाफ्राबाद तालुक्यात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात महसूल प्रशासनाने कारवाई करत मौजे गोंधनखेडा येथून अवैध मुरूम वाहतूक करणारा एक टिप्पर, तसेच काळेगाव (बोबडेवाडी) येथून अवैध रेती उत्खननासा
छ. संभाजीनगर - अवैध मुरूम वाहतूक करणारा टिप्पर व रेती उत्खनन करणारे जेसीबी जप्त


छत्रपती संभाजीनगर, 23 सप्टेंबर (हिं.स.)। जाफ्राबाद तालुक्यात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात महसूल प्रशासनाने कारवाई करत मौजे गोंधनखेडा येथून अवैध मुरूम वाहतूक करणारा एक टिप्पर, तसेच काळेगाव (बोबडेवाडी) येथून अवैध रेती उत्खननासाठी वापरण्यात येणारे एक जेसीबी मशीन जप्त करण्यात आले.

जाफ्राबाद तालुक्यातील मौजे गोंधनखेडा परिसरात अवैधरीत्या मुरूम वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर महसूल प्रशासनाच्या पथकाने कारवाई करत संबंधित एक टिप्पर जप्त केला.

तसेच काळेगाव (बोबडेवाडी) परिसरात अवैधरीत्या रेती उत्खनन सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पथकाने तेथे कारवाई करून रेती उत्खननासाठी वापरण्यात येणारे एक जेसीबी मशीन ताब्यात घेतले.

पकडण्यात आलेली दोन्ही वाहने पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी पोलीस स्टेशन, टेम्भूर्णी यांच्या ताब्यात देण्यात आली आहेत. अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल प्रशासनाकडून अशा प्रकारच्या कारवाया सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande