परभणी : आ. रोहित पवार यांची टाकळी कुं. येथे पीक पाहणी
परभणी, 23 सप्टेंबर (हिं.स.)। परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यात यंदा पावसाने मोठी उघडीप दिल्याने खरिपाची जवळपास सर्व पिके धोक्यात आली असून अनेक भागात पिके करपून गेली आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांन
Q


परभणी, 23 सप्टेंबर (हिं.स.)।

परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यात यंदा पावसाने मोठी उघडीप दिल्याने खरिपाची जवळपास सर्व पिके धोक्यात आली असून अनेक भागात पिके करपून गेली आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथील शेत शिवारात पिकांची पाहणी केली. तसेच उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी आमदार रोहित पवार यांनी, शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठलीही फसवणूक होता कामा नये. त्यांना सरसकट नुकसानभरपाई मिळाली पाहिजे, अशी मागणी राज्य शासनाकडे केली. यावेळी माजी खासदार फौजिया खान, माजी आमदार विजयराव गव्हाणे, पंकज बोराडे, सोनाली देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अजय गव्हाणे, काँग्रेसचे परभणी शहराध्यक्ष रविराज देशमुख, राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष सुशील बोर्डे, नगरसेवक अमोल जाधव, किसान सेलचे प्रदेशाध्यक्ष जगन्नाथ काकडे, आदिवासी सेलचे प्रदेशाध्यक्ष जयवंत वानोळे, प्रदेश सचिव संजय शेटे, डॉ. निलेश दळवी यांच्यासह कार्यकर्ते, शेतकरी आणि शेतमजूर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande