वाकडी शिवारातील दुष्काळजन्य परिस्थितीची आमदार संतोष दानवे यांच्याकडून पाहणी
छत्रपती संभाजीनगर, 23 सप्टेंबर (हिं.स.) : भोकरदन तालुक्यातील वाकडी शिवार येथे निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीची भाजपाचे आमदार संतोष दानवे यांनी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधून पिका
अ


छत्रपती संभाजीनगर, 23 सप्टेंबर (हिं.स.) : भोकरदन तालुक्यातील वाकडी शिवार येथे निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीची भाजपाचे आमदार संतोष दानवे यांनी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांचे नुकसान, पाण्याची टंचाई आणि चाऱ्याच्या उपलब्धतेबाबत माहिती जाणून घेतली.

पावसाअभावी पिके करपण्याच्या स्थितीत असून, पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्याचे यावेळी निदर्शनास आले. शेतकऱ्यांनी पिकांचे झालेले नुकसान तसेच शेतीसमोरील विविध समस्यांची माहिती आमदार दानवे यांना दिली.दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत मिळावी, यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे आमदार दानवे यांनी सांगितले. तसेच दुष्काळी उपाययोजनांबाबतही संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करण्याचे त्यांनी नमूद केले.या पाहणीदरम्यान गणेश पाटील ठाले, रामकृष्ण सुसर, कैलास पाजगे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande