
अंकारा, 24 सप्टेंबर (हिं.स.)।पूर्व तुर्की परिसरात गुरुवारी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. युरोपियन-मेडिटेरेनियन सिस्मोलॉजिकल सेंटरने (ईएमएससी) दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.५. इतकी नोंदवण्यात आली आहे.
माहितीनुसार, भूकंपाच्या हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या या संस्थेने या भूकंपाची खोली १० किलोमीटर (सुमारे ६.२ मैल) असल्याचे सांगितले.भूकंपाची खोली इतकी कमी असल्याने जमिनीच्या पृष्ठभागावर त्याचे धक्के अधिक तीव्रतेने जाणवतात. याउलट, समान तीव्रतेचा भूकंप अधिक खोलवर झाल्यास त्याचे धक्के तुलनेने कमी तीव्रतेने जाणवतात.
पूर्व तुर्की हा जगातील भूकंपाच्या दृष्टीने सर्वाधिक संवेदनशील प्रदेशांपैकी एक आहे. या भागातून ईस्ट अनातोलियन फॉल्ट जाते. तसेच हा प्रदेश अनातोलियन, अरेबियन आणि युरेशियन टेक्टॉनिक प्लेट्सच्या सीमेजवळ स्थित आहे.
या परिसराला विनाशकारी भूकंपांचा मोठा इतिहास आहे. यामध्ये फेब्रुवारी २०२३ मध्ये कहरामनमारास प्रांतात झालेला भूकंप सर्वात भीषण ठरला. या भूकंपात केवळ तुर्कीमध्ये ५३ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. हा भूकंप या शतकातील सर्वाधिक जीवितहानी करणाऱ्या भूकंपांपैकी एक मानला जातो.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode