लातूर - रक्तदात्यांच्या जीवनसुरक्षेसाठी स्वराज्य मंडळाकडून हेल्मेटची अनोखी भेट
लातूर, 24 सप्टेंबर (हिं.स.) स्वराज्य सार्वजनिक गणेश मंडळ, साईनगर, अहमदपूर आणि शौर्य ब्लड बँक, अहमदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने साईनगर येथे एका भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पार पडलेल्या या शिबिराला परिसरातील नागरिकांचा अत्यंत उत
गणेशोत्सव


लातूर, 24 सप्टेंबर (हिं.स.)

स्वराज्य सार्वजनिक गणेश मंडळ, साईनगर, अहमदपूर आणि शौर्य ब्लड बँक, अहमदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने साईनगर येथे एका भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पार पडलेल्या या शिबिराला परिसरातील नागरिकांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरामध्ये तब्बल ७१ रक्तदात्यांनी स्वेच्छेने पुढे येत रक्तदान केले आणि समाजसेवेचा एक आदर्श निर्माण केला, ज्याद्वारे एकूण ७१ रक्तपिशव्यांचे यशस्वी संकलन करण्यात आले.

या संपूर्ण शिबिराचे सर्वात मोठे आणि विशेष आकर्षण म्हणजे रक्तदान करून इतरांचे प्राण वाचविण्याचे महान कार्य करणाऱ्या रक्तदात्यांच्या स्वतःच्या जीवनाचीही सुरक्षा व्हावी, या उदात्त सामाजिक बांधिलकीतून स्वराज्य सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने प्रत्येक रक्तदात्याला सुरक्षेची हमी देणारे 'हेल्मेट' भेट देण्यात आले. “रक्तदानातून दुसऱ्याचे जीवन वाचवूया आणि हेल्मेटच्या माध्यमातून स्वतःचे जीवन सुरक्षित ठेवूया,” असा अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी सामाजिक संदेश या अनोख्या उपक्रमातून उपस्थितांना देण्यात आला.

या रक्तदान शिबिरात साईनगर परिसरातील नागरिक, लातूर रोड येथील गॅरेज लाईनमधील व्यापारी, तसेच स्वराज्य सार्वजनिक गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये अनेक तरुणांनी प्रथमच रक्तदान करत आपली सामाजिक जबाबदारी आनंदूने जपली. हा संपूर्ण उपक्रम यशस्वी करण्यासाठी स्वराज्य सार्वजनिक गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष भाऊ मजगे यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शौर्य ब्लड बँक, अहमदपूर यांच्या संपूर्ण पथकाने अत्यंत मेहनत व परिश्रम घेतले. रक्तदानासारख्या पवित्र कार्यासोबतच रस्ते सुरक्षा आणि नागरिकांच्या व्यक्तिगत सुरक्षेचा मोलाचा संदेश या उपक्रमामुळे गावोगावी व शहरात प्रभावीपणे पोहोचला असून, स्वराज्य सार्वजनिक गणेश मंडळाच्या या आगळ्या-वेगळ्या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande