ग्रेटर नोएडाच्या यमुना एक्सप्रेसवेवर मोठा अपघात; स्लीपर बसला आग लागल्याने ९ प्रवाशांचा मृत्यू
नोएडा, २४ सप्टेंबर (हिं.स.) : दिल्लीच्या काश्मिरी गेटहून उत्तर प्रदेशातील महोबाकडे जाणाऱ्या एका डबल-डेकर बसला बुधवारी मध्यरात्री यमुना एक्सप्रेसवेच्या ३३ व्या किलोमीटरवर आग लागली. बसमध्ये पस्तीस जण होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि
स्लीपर बसला आग लागल्याने ९ प्रवाशांचा मृत्यू


नोएडा, २४ सप्टेंबर (हिं.स.) : दिल्लीच्या काश्मिरी गेटहून उत्तर प्रदेशातील महोबाकडे जाणाऱ्या एका डबल-डेकर बसला बुधवारी मध्यरात्री यमुना एक्सप्रेसवेच्या ३३ व्या किलोमीटरवर आग लागली. बसमध्ये पस्तीस जण होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि जिल्हा प्रशासनाची पथके घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी लोकांना वाचवले. या अपघातात एका महिलेसह नऊ जण जळून खाक झाले. या घटनेमुळे मध्यरात्रीपासून आज सकाळपर्यंत यमुना एक्सप्रेसवेवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यासाठी गॅस कटरने बस कापली.

अतिरिक्त पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) राजीव नारायण मिश्रा यांनी सांगितले की, ३५ प्रवाशांना घेऊन जाणारी एक डबल-डेकर बस बुधवारी मध्यरात्री दिल्लीच्या काश्मिरी गेटहून यमुना एक्सप्रेसवेमार्गे महोबा जिल्ह्यासाठी निघाली होती. त्यांनी सांगितले की, यमुना द्रुतगती मार्गाच्या ३३ व्या किलोमीटरजवळ पोहोचताच बसला अचानक आग लागली. त्यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि जिल्हा प्रशासनाची पथके घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी सांगितले की, बचावकार्यानंतर अंदाजे २६ जणांना बाहेर काढण्यात आले, तर एका महिलेसह नऊ जणांचा भाजल्यामुळे मृत्यू झाला. बसमधील धुरामुळे काही जण बेशुद्ध झाले होते आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

त्यांनी सांगितले की, आगीमुळे बस पूर्णपणे धुराने भरली होती. घटनेच्या वेळी काही जण झोपले होते. त्यांनी सांगितले की, झोपल्यामुळे अनेक जण बसमध्ये अडकले आणि भाजल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. अतिरिक्त आयुक्तांनी सांगितले की, पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यांनी काच फोडली आणि गॅस कटरने बसचा मोठा भाग कापून आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. त्यांनी सांगितले की, काही जणांची ओळख पटली आहे, तर इतरांची ओळख अद्याप पटलेली नाही.

पोलीस सर्व पीडितांची ओळख पटवून त्यांच्या कुटुंबीयांना माहिती देण्याचे काम करत आहेत. बसमध्ये प्रवास करणारी प्रवासी रिंकी राजपूत हिने सांगितले की, ती नोएडा येथून डबल-डेकर बसमध्ये चढली होती आणि रथ येथील तिच्या घरी जात होती. घटनेच्या वेळी ती झोपलेली होती. एका प्रवाशाने बसच्या केबिनवर जोरात ठोका मारून तिला जागे केले. त्यानंतर ती बसमधून बाहेर पडली. तिने सांगितले की, लोकांमध्ये इतकी घबराट पसरली होती की कोणीही आपले सामान उचलले नाही. लोक आपला जीव वाचवण्यासाठी इकडेतिकडे धावत होते.

या घटनेत अनेक लोकांचे सामान, रोकड, दागिने, मोबाईल फोन इत्यादीही जळून खाक झाले. तिने सांगितले की, घटनेनंतर सुमारे अर्ध्या तासाने पोलीस आणि अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी पोहोचली. बसमधील प्रवासी रिंकीच्या म्हणण्यानुसार, या घटनेत नऊपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची भीती आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande