बीड - १० लाखांच्या निधीतून साकारलेल्या सभामंडपाचे लोकार्पण
बीड, 24 सप्टेंबर, (हिं.स.)। गोदावरी तांडा (लोणगाव) येथे नागरिकांच्या वतीने सभामंडपाची मागणी करण्यात आली होती. नागरिकांची ही गरज लक्षात घेऊन या मागणीचा विचार करत १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. या निधीतून साकारलेल्या सभामंडपाचे लोकार्
अ


बीड, 24 सप्टेंबर, (हिं.स.)। गोदावरी तांडा (लोणगाव) येथे नागरिकांच्या वतीने सभामंडपाची मागणी करण्यात आली होती. नागरिकांची ही गरज लक्षात घेऊन या मागणीचा विचार करत १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. या निधीतून साकारलेल्या सभामंडपाचे लोकार्पण आमदार प्रकाश सोळंके यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधत परिसरातील विविध अडचणी व समस्या जाणून घेतल्या. नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांची नोंद घेत, त्यावर आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. तसेच गोदावरी तांड्याला जोडणारा रस्ता नजीकच्या काळात पूर्ण करण्याबाबत आश्वासन देण्यात आले. विकासकामांच्या माध्यमातून नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचा विश्वास यावेळी ग्रामस्थांना दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande