जर अमेरिकेने पुन्हा हल्ला केला, तर युद्ध हिंदी महासागरापर्यंत पसरेल; इराणचा गंभीर इशारा
तेहरान, 24 सप्टेंबर (हिं.स.)।अमेरिका आणि इराण यांच्यात मध्य-पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाला आता नऊ महिने पूर्ण होण्याची वेळ आली आहे. मात्र, अद्याप हे युद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत.इराणच्या सर्वोच्च नेत्यांचे वरिष्ठ सल्लागार यांनी इशारा दिला आहे
जर अमेरिकेने पुन्हा हल्ला केला, तर युद्ध हिंदी महासागरापर्यंत पसरेल; इराणचा गंभीर इशारा


तेहरान, 24 सप्टेंबर (हिं.स.)।अमेरिका आणि इराण यांच्यात मध्य-पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाला आता नऊ महिने पूर्ण होण्याची वेळ आली आहे. मात्र, अद्याप हे युद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत.इराणच्या सर्वोच्च नेत्यांचे वरिष्ठ सल्लागार यांनी इशारा दिला आहे की, अमेरिकेने आणखी एक हल्ला केल्यास तेहरान हा संघर्ष हिंद महासागरापर्यंत वाढवू शकतो.

इराणच्या वृत्तसंस्थाने इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचे वरिष्ठ सल्लागार याह्या रहीम सफवी यांचा एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये रहीम सफवी यांनी म्हटले आहे की, “संघर्ष पर्शियन आखात आणि होर्मुझ सामुद्रधुनीपासून लाल समुद्रापर्यंत पसरला आहे. त्यामुळे आणखी युद्ध झाले, तर हा संघर्ष आणखी पुढे वाढून हिंद महासागरापर्यंत आणि कदाचित त्याही पुढे पोहोचण्याची शक्यता आहे.” मध्य-पूर्वेतील तणाव सर्वोच्च पातळीवर पोहोचलेला असताना इराणकडून हे वक्तव्य करण्यात आले आहे. होर्मुझ सामुद्रधुनीपासून लाल समुद्रापर्यंत जहाजांची वाहतूक मोठ्या प्रमाणात ठप्प झाली आहे.

इराणच्या अधिकाऱ्यांनी वारंवार इशारा दिला आहे की, अमेरिकेकडून कोणतीही नवी लष्करी कारवाई झाल्यास संपूर्ण प्रदेशातील अमेरिकी हितसंबंध आणि मालमत्तांविरोधात प्रत्युत्तराची कारवाई केली जाऊ शकते.वृत्तानुसार, इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने सोमवारी असेही म्हटले की, त्यांना आणखी धमकी दिल्यास ते आपल्या लष्करी रणनीती आणि लक्ष्यांमध्ये बदल करू शकतात.

हिंद महासागर हा जगातील पाच महासागरीय क्षेत्रांपैकी तिसरा सर्वात मोठा महासागर आहे. त्याचे क्षेत्रफळ सुमारे ७०.५ दशलक्ष चौरस किलोमीटर (२७.२ दशलक्ष चौरस मैल) असून, पृथ्वीवरील जलपृष्ठभागाच्या सुमारे २० टक्के भाग त्याने व्यापला आहे. त्याच्या उत्तरेला भारत, इराण, पाकिस्तान आणि बांगलादेश यांसह आशिया खंड आहे.

हिंद महासागर पर्शियन आखाताला भारतासह आशियातील प्रमुख अर्थव्यवस्थांशी जोडतो. या महासागरातून जगातील काही महत्त्वाचे सागरी व्यापारी मार्ग जातात. भारत हिंद महासागराच्या उत्तरेकडील भागात स्थित असून, आखाती देश, आफ्रिका आणि आग्नेय आशियासोबत भारताचे मोठे सागरी व्यापारी संबंध आहेत.हा संघर्ष हिंद महासागरापर्यंत पोहोचल्यास जहाज वाहतूक, विमा, ऊर्जा पुरवठा आणि प्रादेशिक व्यापारावरील जोखीम वाढू शकते. अमेरिका-इराण युद्धाचा परिणाम आधीपासूनच भारतावर होत आहे. तेल, एलपीजी आणि जहाज वाहतुकीचा खर्च वाढल्याने जगभरातील अर्थव्यवस्थांवर त्याचा परिणाम होत आहे.

या व्यापारी सागरी मार्गांपैकी बाब-अल-मंदेब सामुद्रधुनी हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. ही सामुद्रधुनी लाल समुद्राला एडनच्या आखाताशी आणि त्यानंतर हिंद महासागराशी जोडते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande