यमुना एक्स्प्रेसवे अपघात: पंतप्रधानांकडून मृतांच्या कुटुंबीयांना २ लाख, जखमींना ५० हजाराची मदत जाहीर
नवी दिल्ली , 24 सप्टेंबर (हिं.स.)। उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे यमुना एक्स्प्रेसवेवर झालेल्या भीषण अपघातात ९ जणांचा जिवंत जळून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत.दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्
यमुना एक्स्प्रेसवे अपघात:पंतप्रधानांकडून मृतांच्या कुटुंबीयांना २ लाख तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर


नवी दिल्ली , 24 सप्टेंबर (हिं.स.)। उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे यमुना एक्स्प्रेसवेवर झालेल्या भीषण अपघातात ९ जणांचा जिवंत जळून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत.दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांसाठी आणि जखमींसाठी मदतीची घोषणा केली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या. तसेच जखमी लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

यमुना एक्स्प्रेसवेवर बुधवारी रात्री उशिरा विमानतळ इंटरचेंजजवळ डबल डेकर स्लीपर बसने अचानक पेट घेतला. या दुर्घटनेत बसमध्ये अडकलेल्या ९ प्रवाशांचा जिवंत जळून मृत्यू झाला. मृतांमध्ये लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.आग इतकी भीषण होती की मृतदेह मोठ्या प्रमाणात जळून सांगाड्यात रूपांतरित झाले.

आगीची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि यमुना एक्स्प्रेसवेची सुरक्षा पथके घटनास्थळी दाखल झाली. आग आटोक्यात आणल्यानंतरही बस आणि त्यातील सामान अनेक तास धुमसत होते. सुरक्षा पथकांनी बसच्या विविध भागांची बॉडी कापून आत अडकलेले मृतदेह बाहेर काढले आणि त्यानंतर सर्व मृतदेह आणि सापडलेले अवयव कैलाश रुग्णालयात पाठवण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande