सोलापुरात दरोड्याचा मोठा कट गुन्हे शाखेने उधळला
सोलापूर, 24 सप्टेंबर, (हिं.स.)। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात मध्यरात्री दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका आंतरराज्यीय टोळीचा सोलापूर शहर गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. मुळेगाव रोड परिसरातील अमर ज्योती नगरमध्ये धाड टाकून पोलिसांन
Jdjd


सोलापूर, 24 सप्टेंबर, (हिं.स.)। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात मध्यरात्री दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका आंतरराज्यीय टोळीचा सोलापूर शहर गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. मुळेगाव रोड परिसरातील अमर ज्योती नगरमध्ये धाड टाकून पोलिसांनी ७ सराईत गुन्हेगारांना शिताफीने जेरबंद केले. त्यांच्याकडून १ देशी बनावटीचे पिस्तूल, ५ जिवंत राऊंड, २ तलवारी, ३ खंजीर, महिंद्रा XUV 500 कार आणि १ मोटारसायकलसह एकूण १० लाख २९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी शहरातील मालमत्ताविषयक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी विशेष सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना, सपोनि भरत चंदनशिव व पोलीस अंमलदार अमोल यादव (ब.नं. १६६४) यांना खात्रीशीर बातमी मिळाली की, काही संशयित इसम प्राणघातक शस्त्रांसह काळ्या रंगाच्या चारचाकी व मोटारसायकलसह अमर ज्योती नगर (प्लॉट नं. ८३, नरसिंग नगर शेजारी, मुळेगाव रोड) येथे दरोडा टाकण्यासाठी जमा झाले आहेत.

या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने व सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भरत चंदनशिव, सपोनि निलेश सोनवणे, पोउपनि विजय बनसुडे, पोउपनि मनोज मोरे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून संशयितांना चहूबाजूंनी घेराव घातला आणि ताब्यात घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande