बीड - सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याचे आठ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट
बीड, 24 सप्टेंबर (हिं.स.)। लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना लि., सुंदरनगर, तेलगाव येथे ३५ वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ ह.भ.प. महादेव महाराज चाकरवाडीकर यांच्या शुभाशीर्वादाने उत्साहात संपन्न झाला. कारखान्याने आपल्या गाळप क्षमतेनुसार उप
बीड - सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याचे आठ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट


बीड, 24 सप्टेंबर (हिं.स.)। लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना लि., सुंदरनगर, तेलगाव येथे ३५ वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ ह.भ.प. महादेव महाराज चाकरवाडीकर यांच्या शुभाशीर्वादाने उत्साहात संपन्न झाला.

कारखान्याने आपल्या गाळप क्षमतेनुसार उपलब्ध ऊसाचे गाळप करण्याचे काटेकोर नियोजन केले असून, यंदाच्या गळीत हंगामात आठ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. ऊसाची उपलब्धता कमी असो अथवा अधिक, सलग ३४ वर्षे गाळपाची परंपरा कायम ठेवत शेतकऱ्यांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून कारखान्याने आपली वाटचाल सुरू ठेवली आहे.

शेतकऱ्यांनी कारखान्यावर ठेवलेल्या विश्वासामुळेच ही वाटचाल सातत्याने पुढे सुरू राहिली आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक बळ वाढावे आणि त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडावा, यासाठी कारखान्याच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत.

मागील गळीत हंगामात कारखान्याने इतर कारखान्यांच्या तुलनेत चांगला ऊसदर देण्याचा प्रयत्न केला. तसेच, सन २०२६-२७ च्या गळीत हंगामासाठी नुकत्याच संपन्न झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने प्रति टन रु. २,९७०/- ऊसदर देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande