
अमरावती, 24 सप्टेंबर (हिं.स.)। गोळीबार प्रकरण गाडगेनगर पोलीस ठाण्यात दाखल गोळीबाराच्या प्रकरणात विपुल भानुदास ठाकरे याने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज अमरावती येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश, न्यायालय क्रमांक ३ यांनी २३ सप्टेंबर रोजी फेटाळला. या प्रकरणात बीएनएस कलम १०९(१), ३(५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ तसेच शस्त्र प्रतिबंधक कायद्याचे कलम ३ व २५ अन्वये गुन्हा दाखल आहे.
फिर्यादीच्या घराच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. तपासादरम्यान पोलिसांनी चार आरोपींना अटक करून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले. त्यानंतर तपासात विपुल ठाकरे याचे नाव समोर आल्याचे पोलीस तपासात समोर आलेले आहे.ठाकरे याचे नाव एफआयआरमध्ये नसणे, त्याच्याकडून शस्त्र जप्त न होणे आणि त्याने स्वतः गोळीबार केल्याचा थेट आरोप नसणे, या बाबी न्यायालयाने नोंदवल्या. मात्र, एका सहआरोपीचे पॅनकार्ड व इतर कागदपत्रे ठाकरेच्या घरातून मिळाल्याचे, सहआरोपी तेथे राहत असल्याचे साक्षीदारांनी सांगितल्याचे तसेच त्यांच्या फोन पे व्यवहार तपासात आढळल्याचे सरकारी पक्षाने नमूद केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी