दिल्ली जल बोर्ड एसटीपी घोटाळा प्रकरणात सत्येंद्र जैन यांना जामीन मंजूर
नवी दिल्ली, ३ सप्टेंबर (हिं.स.)राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांना दिल्ली जल बोर्ड एसटीपी घोटाळ्याप्रकरणी जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने जैन यांना २ लाख रुपयांचा वैयक्तिक जामीन आणि तेवढ्याच रकमेचे दोन जामीनदार साद
सत्येंद्र जैन


नवी दिल्ली, ३ सप्टेंबर (हिं.स.)राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांना दिल्ली जल बोर्ड एसटीपी घोटाळ्याप्रकरणी जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने जैन यांना २ लाख रुपयांचा वैयक्तिक जामीन आणि तेवढ्याच रकमेचे दोन जामीनदार सादर करण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला. न्यायालयाने २५ ऑगस्ट रोजी जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता.

सुनावणीदरम्यान, सत्येंद्र जैन यांच्या वकिलांनी सांगितले की, गुन्हा दाखल झाल्यानंतर २७ महिन्यांनी जैन यांना अटक करण्यात आली होती आणि त्यांना केवळ एकदाच चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. एसीबीने असा युक्तिवाद केला की जैन हे सराईत गुन्हेगार आहेत. सत्येंद्र जैन आणि इतर आरोपींना १८ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. जैन यांचे वकील मनिंदर सिंग यांनी जैन यांची अटक बेकायदेशीर असल्याचे म्हटले. त्यांनी असा युक्तिवाद केला की जैन यांच्या अटकेचे कारण उघड केले गेले नाही, ज्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाले आहे.

सत्येंद्र जैन यांच्या व्यतिरिक्त, एसीबीने दिल्ली जल बोर्डाचे माजी सीईओ उदित प्रकाश राय, दिल्ली जल बोर्डाचे माजी कंत्राटी सल्लागार अंकित श्रीवास्तव, मेसर्स एएन एंटरप्रायझेसचे मालक नागेंद्र यादव, मेसर्स युरोटेक एन्व्हायर्नमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे मालक राजा कुमार कुर्रा आणि मेसर्स सृजनहारचे मालक पंकज वर्मा यांना अटक केली होती. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७, ७अ, ९, १३ आणि भारतीय दंड संहितेच्या कलम ४२, ४०९, ४१८ आणि १२०-ब अंतर्गत ११ मे २०२४ रोजी एसीबीने नोंदवलेल्या एफआयआरच्या संदर्भात या आरोपींना अटक करण्यात आली होती.

एसीबीचा आरोप आहे की, निविदेच्या अटी एका विशिष्ट कंपनीला अनुकूलता दर्शवण्यासाठी तयार करण्यात आल्या होत्या. सत्येंद्र जैन यांची ऑक्टोबर २०२४ मध्ये मनी लाँडरिंगच्या आरोपाखाली तिहार तुरुंगातून सुटका झाली होती. त्यांनी मनी लाँडरिंग प्रकरणात ८७२ दिवस तुरुंगात घालवले होते. ईडीने त्याला ३० मे २०२२ रोजी अटक केली. सत्र न्यायालयाने त्याला १८ ऑक्टोबर २०२४ रोजी जामीन मंजूर केला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande