नांदेड - ७ सप्टेंबर रोजी येथे भोई समाजाच्या हक्कासाठी एल्गार मोर्चा
नांदेड, 03 सप्टेंबर (हिं.स.)। दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी नांदेड येथे भोई समाज नांदेड जिल्हा महासंघ व महाराष्ट्रातील भोई समाज बांधवांच्या वतीने समाजाच्या विविध मागण्यांसाठी एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला सेवा जनशक्ती पार्टीचे पक्षप
अ


नांदेड, 03 सप्टेंबर (हिं.स.)। दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी नांदेड येथे भोई समाज नांदेड जिल्हा महासंघ व महाराष्ट्रातील भोई समाज बांधवांच्या वतीने समाजाच्या विविध मागण्यांसाठी एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला सेवा जनशक्ती पार्टीचे पक्षप्रमुख प्रा. मनोहर धोंडे यांनी आपला ठाम पाठिंबा दर्शविला आहे.

कंधार–लोहा तालुक्यातील भोई समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी प्र. मनोहरजी धोंडे सरांनी वेळोवेळी पुढाकार घेऊन अनेक प्रश्नांवर पाठपुरावा व कामगिरी केली आहे. त्यामुळे आज समाजाच्या हक्कासाठी होणाऱ्या या मोर्चात आपणही मोठ्या संख्येने सहभागी होणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे.

त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील तसेच कंधार व लोहा तालुक्यातील सर्व भोई समाज बांधव, माता-भगिनी व युवकांना नम्र आवाहन करण्यात आले आहे.

एकजुटीने, एकसंघपणे आणि मोठ्या संख्येने दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी नांदेड येथे उपस्थित राहून भोई समाजाच्या हक्कासाठी आपला आवाज बुलंद करूया, असे आवाहन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande