कोल्हापूर जिल्ह्यातील 31 आरोग्य उपकेंद्रांच्या नवीन इमारतींसाठी 19 कोटींचा निधी मंजूर
कोल्हापूर, 03 सप्टेंबर (हिं.स.)|जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, सुसज्ज व नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने 15 व्या वित्त आयोगांतर्गत जिल्ह्यातील 31 आरोग्य उपकेंद्रांच्या नवीन इमारतींच्या बांधकामासाठी निधी मंजूर करण्यात आ
कोल्हापूर जिल्ह्यातील 31 आरोग्य उपकेंद्रांच्या नवीन इमारतींसाठी 19 कोटींचा निधी मंजूर


कोल्हापूर, 03 सप्टेंबर (हिं.स.)|जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, सुसज्ज व नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने 15 व्या वित्त आयोगांतर्गत जिल्ह्यातील 31 आरोग्य उपकेंद्रांच्या नवीन इमारतींच्या बांधकामासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. प्रत्येक आरोग्य उपकेंद्रासाठी 61 रु. लाख इतका निधी उपलब्ध होणार असून, एकूण अंदाजे 18 कोटी 91 लाख रु. इतका निधी या कामांसाठी उपलब्ध होणार आहे.

आरोग्य उपकेंद्रांच्या नवीन इमारतींसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून करण्यात येत होती. या मागणीची दखल घेऊन जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य समितीच्या सभापती सारिका नांदेकर यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. या पाठपुराव्यास सकारात्मक प्रतिसाद मिळून 31 आरोग्य उपकेंद्रांच्या नवीन इमारतींसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.

तालुकानिहाय मंजूर आरोग्य उपकेंद्रे पुढीलप्रमाणे-

भुदरगड - 7 उपकेंद्रे - तिरवडे, वेसर्डे, सोनारवाडी, निळपण, वाघापूर, मडिलगे व मुदाळ

राधानगरी - 1 उपकेंद्र -लिंगाचीवाडी

पन्हाळा - 2 उपकेंद्रे- पाटपन्हाळा व हरपवडे

गडहिंग्लज - 6 उपकेंद्रे - हरळी बु., चन्नेकुपी, गिजवणे, करंबळी, वडरगे, दुरंडे

कागल - 1 उपकेंद्र - बेलवळे बु.

चंदगड - 1 उपकेंद्र - बसर्गे

शाहूवाडी - 6 उपकेंद्रे- कडवे, गजापूर, रेठरे, तुरुकवाडी, कापशी, सावते

हातकणंगले - 4 उपकेंद्रे- घुणकी, वाठार, कबनूर, तारदाळ

शिरोळ- 3 उपकेंद्रे - टाकवडे, शिरटी, हासूर अशी एकूण 31 उपकेंद्रे मंजूर झाली आहेत.

या निधीमुळे जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी चालना मिळणार असून, दुर्गम व ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावाच्या परिसरातच गुणवत्तापूर्ण व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

या निर्णयाबद्दल जिल्ह्यातील नागरिक, ग्रामस्थ तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande