रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी भारत योगदान देण्यास तयार : एस. जयशंकर
कीव, 03 सप्टेंबर (हिं.स.) : रशिया-युक्रेन युद्ध समाप्त करण्याच्या प्रयत्नांमध्ये भारत कोणत्याही प्रकारे योगदान देण्यास तयार असल्याचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी युक्रेनची राजधानी कीव येथे स्पष्ट केले. यासंदर्भात सुब्रमण्यम जयशंकर म्हणाले की,
परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर


कीव, 03 सप्टेंबर (हिं.स.) : रशिया-युक्रेन युद्ध समाप्त करण्याच्या प्रयत्नांमध्ये भारत कोणत्याही प्रकारे योगदान देण्यास तयार असल्याचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी युक्रेनची राजधानी कीव येथे स्पष्ट केले.

यासंदर्भात सुब्रमण्यम जयशंकर म्हणाले की, भारत कोणत्याही प्रकारे मदत करू शकत असेल, तर त्यासाठी आम्ही तयार आहोत.” युद्धाचा लवकरात लवकर शांततापूर्ण मार्गाने अंत व्हावा, यासाठी भारत सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले. जयशंकर 3 ते 5 सप्टेंबरदरम्यान युक्रेन आणि पोलंडच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. रशियाने युक्रेनविरोधात व्यापक लष्करी कारवाई सुरू केल्यानंतर जयशंकर यांची कीवला झालेली ही पहिलीच भेट आहे. या दौऱ्यात ते युक्रेनचे परराष्ट्र मंत्री आंद्रिय सिबिहा तसेच पोलंडचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री राडोस्लाव सिकोरस्की यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करत आहेत.जयशंकर यांचे हे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिश्केक येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेदरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत युद्ध समाप्त करण्याच्या आवाहनाचा पुनरुच्चार केल्यानंतर आले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी युद्धाच्या मानवी परिणामांवर चिंता व्यक्त करताना म्हटले होते की, युद्धात गेलेला प्रत्येक दिवस मानवतेला मागे ढकलतो, तर शांततेच्या दिशेने उचललेले प्रत्येक पाऊल मानवतेमध्ये नवी आशा आणि उत्साह निर्माण करते. आपल्याला अंतहीन युद्धापासून युद्धाच्या समाप्तीकडे वाटचाल करावी लागेल. मानवतेच्या कल्याणासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे असे मोदी यांनी म्हटले होते.सर्व प्रश्नांचे शक्य तितक्या लवकर शांततापूर्ण मार्गाने निराकरण व्हावे, हीच मानवतेची हाक असून, हाच भारताचा संदेश असल्याचेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले होते. “हीच गांधी आणि बुद्धाच्या भूमीची शिकवण आहे, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, जयशंकर यांचा कीव दौरा रशिया-युक्रेनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर होत आहे. याच आठवड्यात कीवमध्ये झालेल्या रशियन हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्याने भारताची चिंता वाढली आहे. तसेच काळ्या समुद्रातील व्यापारी जहाजांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबतही भारताने चिंता व्यक्त केली आहे.---------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande