
छत्रपती संभाजीनगर, 03 सप्टेंबर (हिं.स.)। मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी मागील तीन दिवसांपासून दोन मंत्री आणि एक आमदार छत्रपती संभाजी नगर मध्ये ठाण मांडून आहेत,मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत,आमदार प्रसाद लाड उपोषण सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, ज हॉटेलमध्ये मंत्री थांबले आहेत आणि जरांगे पाटलांसाठी बैठकांवर बैठका होत आहेत
राज्य सरकारच्यावतीने बुधवारी आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली. यावेळी जरांगे यांच्या सर्व मागण्या सरकारकडून करण्यात आल्या असल्याचे यावेळी आमदार लाड यांनी सांगितले. मात्र, मनोज जरांगे पाटील यांनी पाणी पितो, सलाईन लावतो पण उपोषण सोडणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली. सर्व मागण्यांची अंमलबाजवणी सुरु करा त्यानंतर उपोषण सोडतो, असे जरांगे यांनी स्पष्ट केले. आता हे लोकप्रतिनिधी जरांगेंचे मन वळवण्याचा प्रयत्न करीत असून सरकार आणि आंदोलक यांच्यातील दुवा म्हणून भूमिका
पार पाडत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis