अमरावती : दंगलप्रकरणी आमदार राजेश वानखडे यांच्यासह तिघांची निर्दोष मुक्तता
अमरावती, ३ सप्टेंबर (हिं.स.) : नोव्हेंबर २०२१ मध्ये अमरावती शहरात झालेल्या जातीय दंगलीदरम्यान राजकमल चौक आणि बग्गा प्लॉट परिसरातील दोन प्रार्थनास्थळांचे नुकसान केल्याप्रकरणी आमदार राजेश वानखडे, निषाद जोध आणि प्रतीक डुकरे या तिघांची अतिरिक्त मुख्य न
आमदार राजेश वानखडे यांची जातीय दंगलीच्या आरोपातून निर्दोष मुक्तता


अमरावती, ३ सप्टेंबर (हिं.स.) : नोव्हेंबर २०२१ मध्ये अमरावती शहरात झालेल्या जातीय दंगलीदरम्यान राजकमल चौक आणि बग्गा प्लॉट परिसरातील दोन प्रार्थनास्थळांचे नुकसान केल्याप्रकरणी आमदार राजेश वानखडे, निषाद जोध आणि प्रतीक डुकरे या तिघांची अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी चांडक यांच्या न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

नोव्हेंबर २०२१ मध्ये अमरावती शहरात जातीय दंगल झाली होती. या काळात राजकमल चौकातील किरण फूड्ससमोरील तसेच कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बग्गा प्लॉट परिसरातील दोन प्रार्थनास्थळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले होते.या प्रकरणी पोलिसांनी भाजप नेते राजेश वानखडे, निषाद जोध आणि प्रतीक डुकरे यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १४३, १४७, १४८ आणि १४९ अन्वये गुन्हा दाखल केला होता. तपास पूर्ण केल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.खटल्याच्या सुनावणीदरम्यान बचाव पक्षाने साक्षीदारांची उलटतपासणी केली. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने पुराव्यांच्या आधारे तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.या प्रकरणात बचाव पक्षातर्फे ऍड. प्रशांत देशपांडे, ऍड. मोहित जैन आणि ऍड. प्रथमेश तिवारी यांनी बाजू मांडली.

---------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande