
बीड, 03 सप्टेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र विधानमंडळ पंचायत राज समिती तीन दिवसांच्या अकोला दौऱ्यावर आहे. आज अकोला जिल्हा परिषद येथे आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीस उपस्थित राहून आ. विजयसिंह पंडित यांनी कामकाजात सहभाग घेतला.
बैठकीमध्ये सन २०२१-२२ च्या लेखापरीक्षा पुनर्विलोकन अहवालातील अकोला जिल्हा परिषदेशी संबंधित विविध परिच्छेदांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी संबंधित बाबींवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची साक्ष नोंदवून प्रशासकीय कामकाजाची सखोल पडताळणी करण्यात आली. आ. विजयसिंह पंडित यांनी यावेळी सक्रिय सहभाग घेऊन प्रत्येक बाबींवर अभ्यासपूर्ण प्रश्न विचारून महत्त्वपूर्ण सुचना केल्या.
आ. विजयसिंह पंडित यांनी बीड जिल्हा परिषदेत सदस्य, सभापती आणि अध्यक्ष म्हणून केलेल्या कामकाजाचा व अनुभवाचा त्यांना या दौऱ्याच्या निमित्ताने मोठा फायदा झाला. पंचायतराज समितीच्या सर्व सदस्यांचे अकोला जिल्हा परिषदेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis