
छत्रपती संभाजीनगर, 03 सप्टेंबर (हिं.स.)। मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ आज धाराशिव बंद ठेवण्यात आले हे. सलग दोन दिवस धाराशिवमध्ये आक्रमक होत मराठा समाजाने आंदोलन केले आहे. तर आज जिल्हा बंद ठेवण्यात आहे. सरकारने लवकर प्रतिसाद दिला नाही, तर येत्या काळात अधिक आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मराठा समाजाकडून पुकारण्यात आलेल्या बंदला व्यापारी संघटनांही पाठिंबा दिला आहे.
मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचे धाराशिवमध्ये तीव्र पडसाद उमटत आहेत. मराठा समाजाकडून आज जिल्हाभर बंद पाळला जात आहे. गेली दोन दिवस धाराशिवमध्ये मराठा समाज बांधव रस्त्यावर येत असून आक्रमक पद्धतीने आंदोलन केले जात आहे. सर्वांनी या बंदमध्ये स्वखुशीने सहभागी व्हावं असं आवाहन मराठा कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे. तरी येत्या काळात सरकारने लवकर प्रतिसाद दिला नाही तर अधिक आक्रमक आंदोलन करू असा इशाराही दिला आहे. मराठा समाजाकडून पुकारण्यात आलेल्या बंदला व्यापारी संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis