
बीड, 03 सप्टेंबर (हिं.स.)। गेवराईतून मोटारसायकल रॅली अंतरवालीच्या दिशेने; शहरासह तालुक्यातील गावोगावी कडकडीत बंद पाळण्यात आला
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी सकाळी गेवराईतून मराठा बांधवांची मोटारसायकल रॅली उत्साहात रवाना झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रॅलीला सुरुवात झाली. भगवे ध्वज आणि ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणांनी शहर दुमदुमून गेले.
दरम्यान, बीड जिल्हा बंदच्या आवाहनाला गेवराई शहरासह तालुक्यातील गावांमध्येही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यापारी व व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवून बंदला पाठिंबा दिल्याचे चित्र आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis