बीड - टिपरे महोत्सवांतर्गत भोलोबा (फेर) गीत, रिल्स व सोंग स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
बीड, 03 सप्टेंबर (हिं.स.)। गेवराईच्या लोककला आणि सांस्कृतिक परंपरेचा उत्सव ठरलेल्या शारदा प्रतिष्ठान आयोजित टिपरे महोत्सवांतर्गत भोलोबा (फेर)गीत, रिल्स व सोंग स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ अट्टल महाविद्यालयातील गोदावरी सभागृहात मोठ्या उत्साहात स
अ


बीड, 03 सप्टेंबर (हिं.स.)। गेवराईच्या लोककला आणि सांस्कृतिक परंपरेचा उत्सव ठरलेल्या शारदा प्रतिष्ठान आयोजित टिपरे महोत्सवांतर्गत भोलोबा (फेर)गीत, रिल्स व सोंग स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ अट्टल महाविद्यालयातील गोदावरी सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

शिवशारदा मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष श्री. जयसिंग पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विजेत्यांचा रोख पारितोषिके व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

रिल्स स्पर्धेत यश शेटे (तलवाडा) यांनी प्रथम, सुरज शिनगारे (आंतरवाली) यांनी द्वितीय, तर कार्तिक गणेश गायकवाड (गढी) यांनी तृतीय क्रमांक पटकावला. अविनाश पवार (मानसिंग तांडा) व साहिल सय्यद (संजयनगर) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान करण्यात आले.

भोलोबा (फेर)गीत स्पर्धेत मनेश्वर महिला मंडळ, तळेवाडी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. लक्ष्मी महिला ग्रुप, मन्यारवाडी यांनी द्वितीय, तर एकलिंगेश्वर महिला मंडळ, पाडळसिंगी यांनी तृतीय क्रमांक मिळविला. झुंजार नारी मंच, मोटे गल्ली, गेवराई आणि जगदंबा महिला ग्रुप, भवानीपेठ, गेवराई यांना उत्तेजनार्थ पारितोषिकाने गौरविण्यात आले.

सोंग स्पर्धेत शौर्य नंदकुमार दाभाडे (गेवराई) यांनी प्रथम पारितोषिक मिळविले.

यावेळी दैनिक रिपोर्टरचे संपादक शेख तय्यब, आयबीएन मराठीचे जिल्हा प्रतिनिधी सुरेश जाधव, बाजार समितीचे सभापती जगन्नाथ काळे, माजी संचालक जालिंदर पिसाळ, ॲड. एच. एस. पाटील, परीक्षक ॲड. सुभाष निकम, विष्णू खेत्रे, विलास सोनवणे, गजाशिवशारदानन काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी सुरेश जाधव यांनी माजी मंत्री स्व. शिवाजीराव पंडित साहेबांनी तळागाळातील लोकांपर्यंत ज्ञानाची गंगा पोहोचविण्यासाठी केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांचा विचारांचा वारसा पुढे नेत माजी आमदार श्री. अमरसिंह पंडित आणि आमदार श्री. विजयसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली शारदा प्रतिष्ठान विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबवत असल्याचे त्यांनी सांगितले.

टिपरे महोत्सवाच्या माध्यमातून गेवराईच्या मातीत रुजलेल्या प्राचीन लोककला, लोकगीत आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन-संवर्धन करून त्या नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा शारदा प्रतिष्ठानचा प्रयत्न आहे. स्थानिक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देत या समृद्ध सांस्कृतिक वारशाची परंपरा पुढे नेण्यासाठी प्रतिष्ठान यापुढेही कटिबद्ध राहील.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande