प्रा. पराग जोशी यांना राज्य शासनाचा डॉ. जे. पी. नाईक आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार जाहीर
बीड, 03 सप्टेंबर (हिं.स.)। प्रा. पराग जोशी यांना राज्य शासनाचा अत्यंत मानाचा डॉ. जे. पी. नाईक आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार जाहीर करण्यात आला असून बीड जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे आमदार धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे. परळीचे भूमिपुत्र प्रा
अ


बीड, 03 सप्टेंबर (हिं.स.)। प्रा. पराग जोशी यांना राज्य शासनाचा अत्यंत मानाचा डॉ. जे. पी. नाईक आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार जाहीर करण्यात आला असून बीड जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे आमदार धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.

परळीचे भूमिपुत्र प्रा. पराग जोशी यांना राज्य शासनाचा अत्यंत मानाचा डॉ. जे. पी. नाईक आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार जाहीर झाला असून येत्या ५ तारखेला राज्यस्तरीय शासकीय समारंभात त्याचे वितरण केले जाईल.

प्रा. पराग जोशी यांनी शिक्षण क्षेत्रात संस्कृत भाषेत दिलेल्या विशेष योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात येत असून, प्रा. पराग यांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा. आम्हा समस्त परळीकरांना आपला सार्थ अभिमान आहे! असेही आमदार धनंजय मुंडे म्हणाले

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande