बीड - बेकायदेशीररीत्या पुतळा बसवल्याप्रकरणी पाचेगावच्या ५ आरोपींना नियमित जामीन मंजूर
बीड, 03 सप्टेंबर (हिं.स.)। गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून आणि जमावबंदीचा कायदा मोडून बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या पाचेगाव येथील ५ आरोपींना न्यायालयाने
बीड - बेकायदेशीररीत्या पुतळा बसवल्याप्रकरणी पाचेगावच्या ५ आरोपींना नियमित जामीन मंजूर


बीड, 03 सप्टेंबर (हिं.स.)। गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून आणि जमावबंदीचा कायदा मोडून बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या पाचेगाव येथील ५ आरोपींना न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला आहे. आरोपींच्या वतीने प्रसिद्ध विधीज्ञ ॲड. नारायण शिंदे आणि ॲड. सुभाष गायकवाड यांनी न्यायालयात बाजू मांडली.

पाचेगाव येथील ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) विलास बप्पासाहेब मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पाचेगाव येथील भगवान बाबा चौकातील मोकळ्या जागेत काही अज्ञात व्यक्तींनी लोखंडी चबूतऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा उभारला होता.

बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आधीच लागू केलेल्या जमावबंदी आदेशाचे (क्र. २०२६/गृहविभाग/प्र.कार्यवाही/१/१/म.पो.अ. १९५१, दि. २०.०२.२०२६) उल्लंघन करून, कोणतीही पूर्वपरवानगी न घेता १० ते १२ अज्ञात लोकांनी हा पुतळा उभारल्याचे निष्पन्न झाले होते. यावरून गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा (रजि. नं. २००/२०२६) दाखल करण्यात आला होता.

पोलीस अंमलदार आणि तपास अधिकारी एल. डी. जायभाये (ब.नं. ५७३) यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम १८९(२), १९०, २२३, ३२९(३) सह महाराष्ट्र पुतळ्यांच्या पावित्र्य भंगास प्रतिबंध अधिनियम १९९७ चे कलम ११ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम १३५ अन्वये न्यायालयात दोषारोपण पत्र (Chargesheet No. २८२/२०२६) दाखल केले होते. या गुन्ह्यात पाचेगाव येथील खालील ५ जणांना आरोपी करण्यात आले होते.

या प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲड. नारायण शिंदे आणि ॲड. सुभाष गायकवाड यांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा नसल्याचे व आरोपी तपासात सहकार्य करत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने कायदेशीर बाबी आणि परिस्थितीचा विचार करून सर्व ५ आरोपींना नियमित जामीन मंजूर केला. या निर्णयामुळे आरोपींच्या कुटुंबियांना आणि पाचेगाव परिसरातील त्यांच्या समर्थकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande