बीड - अमृता सभागृह कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आढावा बैठक संपन्न
बीड, 03 सप्टेंबर (हिं.स.)। माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस श्री अमरसिंह पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अमृता सभागृह कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आढावा बैठक संपन्न झाली. गेवराई विधानसभा मतदार संघामध्ये पाऊस अल्प
अ


बीड, 03 सप्टेंबर (हिं.स.)। माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस श्री अमरसिंह पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अमृता सभागृह कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आढावा बैठक संपन्न झाली. गेवराई विधानसभा मतदार संघामध्ये पाऊस अल्प प्रमाणात झाल्यामुळे बहुतांश ठिकाणी तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून पाणी टँकर सुरू करण्याची मागणी वाढली आहे. पाणी टँकर, पाण्याचे स्रोत, व्ही.बी.जी.राम योजने अंतर्गतचे प्रलंबित प्रस्ताव, तुती लागवडचे मस्टर आदी विषयावर अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून कामे मार्गी लावण्या बाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

यावेळी उपविभागीय अधिकारी शुभम पवार, तहसीलदार गीतांजली गरड, गटविकास अधिकारी बिलगे, तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी, नगर परिषदेचे कर्डीले, विलास राठोड, देशमुख आदी अधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande