
दुबई, 03 सप्टेंबर (हिं.स.)भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाने आणखी एक विक्रम रचला आहे. तिने भारताची माजी कर्णधार मिताली राजला मागे टाकत महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी क्रिकेटपटू बनण्याचा मान मिळवला आहे.
स्मृती मानधना तिचे ३६ वे टी२० आंतरराष्ट्रीय अर्धशतक झळकावले. षटकार मारून तिने आपले शतक पूर्ण केले, मात्र यासाठी तिला ४० चेंडू लागले. त्यानंतर वेग वाढवत तिने केवळ १७ चेंडूंमध्ये आपले पुढचे अर्धशतक पूर्ण केले. स्मृती मानधनाने ५७ चेंडूंमध्ये आपले दुसरे टी२० आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले. स्मृती मंधानाने ६४ चेंडूंमध्ये १४ चौकार आणि सात षटकारांसह १२४ धावा केल्या.
स्मृतीने मिताली राजला टाकले मागे
महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०,८८० मानधनाने धावा केल्या असून, तिने मिताली राजचा १०,८६८ धावांचा विक्रम मागे टाकला आहे. मिताली राजने दीर्घकाळ या यादीत अव्वल स्थान पटकावले होते आणि ती भारतीय महिला क्रिकेटमधील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक राहिली आहे. मिताली राजच्या निवृत्तीनंतर, मानधनाने भारतीय महिला क्रिकेटमधील सर्वात मोठी फलंदाजीची स्टार म्हणून नवनवीन उंची गाठत आहे. स्मृती मधानाने केवळ मितालीचा विक्रम मोडला नाही, तर महिला क्रिकेटमधील भारतीय फलंदाजीसाठी एका नवीन युगाची सुरुवातही केली.
टी-20 क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिका शतकांचा विक्रम
भारतीय महिला संघाने आतापर्यंत टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन शतके झळकावली आहेत. या यादीत स्मृती मानधनाने दोनदा दिसली आहे. तिने २०२५ मध्ये ट्रेंट ब्रिज येथे इंग्लंडविरुद्ध ११२ धावांची शानदार खेळी केली होती. पण, मानधनाची १२४ धावांची खेळी ही टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कोणत्याही भारतीय महिलेने केलेली सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. हरमनप्रीत कौरने २०१८ च्या टी-२० विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध १०३ धावा करून हा पराक्रम केला होता.
महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके
स्मृती मानधनाने महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा नवीन विक्रमही प्रस्थापित केला आहे. तिच्या नावावर आता १८ आंतरराष्ट्रीय शतके आहेत. या यादीत तिने ऑस्ट्रेलियाची मेग लॅनिंग आणि दक्षिण आफ्रिकेची लॉरा वॉल्व्हार्ड यांना मागे टाकले आहे. ऑस्ट्रेलियाची माजी कर्णधार मेग लॅनिंग आणि दक्षिण आफ्रिकेची स्टार फलंदाज एल वॉल्व्हार्ड प्रत्येकी १७ शतकांसह दुसऱ्या स्थानावर बरोबरीत आहेत. वेस्ट इंडिजची हेली मॅथ्यूज १५ शतकांसह चौथ्या स्थानावर आहे, तर न्यूझीलंडची सुझी बेट्स आणि इंग्लंडची टॅमी ब्यूमॉन्ट प्रत्येकी १४ शतकांसह पाचव्या स्थानावर बरोबरीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे