नाशकातील राष्ट्रभक्ती वाहतूक बेटावर झळकणार दोन मिग-२१ फायटर जेट
नाशिक, 03 सप्टेंबर (हिं.स.)। :- मुंबई आग्रा महामार्ग लगतच्या लेखानगर येथे आणण्यात आलेली दोन मिग-२१ फायटर जेट विमाने सध्या रंगकाम व आवश्यक सुशोभीकरणाच्या प्रक्रियेत असून येत्या दोन ते तीन महिन्यांत ही दोन्ही मिग-२१ विमाने लेखानगर येथील ''राष्ट्रभक
नाशकातील राष्ट्रभक्ती वाहतूक बेटावर झळकणार दोन मिग-२१ फायटर जेट


नाशिक, 03 सप्टेंबर (हिं.स.)।

:- मुंबई आग्रा महामार्ग लगतच्या लेखानगर येथे आणण्यात आलेली दोन मिग-२१ फायटर जेट विमाने सध्या रंगकाम व आवश्यक सुशोभीकरणाच्या प्रक्रियेत असून येत्या दोन ते तीन महिन्यांत ही दोन्ही मिग-२१ विमाने लेखानगर येथील 'राष्ट्रभक्ती वाहतूक बेटावर' दिमाखात उभारण्यात येणार आहेत. भारतीय वायुदलाच्या गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार असलेले मिग-२१ सन १९६५ आणि १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात, तसेच १९९९ च्या कारगिल युद्धात आणि २०१९ च्या बालाकोट हवाई कारवाईदरम्यान महत्त्वपूर्ण भूमिकेत होते. विशेषतः १९७१ च्या युद्धात मिग-२१ने बजावलेली भूमिका ऐतिहासिक ठरली. शिवसेना महानगरप्रमुख तथा नगरसेवक प्रविण तिदमे यांच्या संकल्पनेतून साकार होणारा हा उपक्रम भारतीय सैन्याच्या शौर्याला आणि राष्ट्रभक्तीच्या भावनेला सलाम करणारा ठरणार आहे. विमानाचे रंगकाम व सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर या दोन्ही मिग-२१चे 'राष्ट्रभक्ती वाहतूक बेटावर' लोकार्पण करण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande