
बीड, 03 सप्टेंबर, (हिं.स.)। मराठवाड्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीची तातडीने दखल घेण्याची गरज असल्याचे निवेदन गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठवले आहे. अल्प व अनियमित पाऊस, पिकांचे झालेले नुकसान आणि निर्माण होत असलेली पाणीटंचाई यामुळे शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांसमोर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात ‘कोरडा दुष्काळ’ जाहीर करून खरीप, फळबाग व नगदी पिकांचे पंचनामे करत नुकसानभरपाई द्यावी, आवश्यकतेनुसार पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावेत, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे तसेच दुष्काळी सवलती लागू करून शेतकरी व ग्रामीण जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी आ. विजयसिंह पंडित यांनी मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis