
मुंबई, 03 सप्टेंबर, (हिं.स.)। अनेक कलाकार रोज एयरपोर्ट वरून प्रवास करताना दिसतात पण आज विमान तळावर पॅपाराझीने ट्रेंडसेटर गायक अभिजीत सावंतला स्पॉट करत तब्बल २१ वर्ष जून “मोहब्बतें लुटाऊँगा” हे गाण गाण्याची खास फार्माइश केली आणि अभिजीतने त्याचा एव्हरग्रीन गाण्याच्या दोन ओळी गायल्या.
पहिल्या वहिल्या इंडियन आयडॉलचा विजेता ते आजवर रसिक प्रेक्षकांची मन जिंकून घेणारा अभिजीत हा कायम वेगवेगळ्या गाण्यानी प्रेक्षकांना मोहित करताना दिसतो. अभिजीतच्या आवाजाची जादू आजही तितकीच खास आहे यात शंका नाही.
तब्बल २१ वर्षांनी देखील अभिजीतच्या “मोहब्बतें लुटाऊँगा” या गाण्याची क्रेझ बघायला मिळते पण आज पॅपाराझीच्या आग्रहाखातर गायलेलं “मोहब्बतें लुटाऊँगा” हे अभिजीत साठी कायम खास राहिल .
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर