
बीड, 04 सप्टेंबर (हिं.स.)। यावर्षी संपूर्ण पावसाळ्यात पावसाने तीव्र ताण दिल्याने संपूर्ण बीड जिल्ह्यात खरिपातील पिके अक्षरश: करपू लागली आहेत. शेतकरी व सर्वसामान्य नागरिक संकटात सापडले असून बीड जिल्ह्यात पर्जन्यमानाच्या आकडेवारीनुसार कोरडा दुष्काळ जाहीर करून त्यानुसार सवलती देण्याची विनंती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे आमदार धनंजय मुंडे यांनी पत्राद्वारे केली आहे.
त्याचबरोबर खरिपातील पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचीही विनंती केली आहे. अवर्षणामुळे तलाव - विहिरी कोरड्या पडत असून पिण्याच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील आगामी काही दिवसात गंभीर होणार आहे, या दुष्काळचक्रावर नियंत्रण आणण्यासाठी विशिष्ट नियोजन करण्यासोबतच कृत्रिम पावसाचे प्रयोग करण्याचीही मागणी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis