
बीड, 04 सप्टेंबर (हिं.स.)।
बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील रुई गावचे सुपुत्र, डॉ. ज्ञानेश्वर आंधळे यांची महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक (MUHS) च्या विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीत 'सचिव' पदी बिनविरोध निवड झाली आहे.
आपल्या मातीतील एका तरुणाने राज्यपातळीवर आपल्या नेतृत्त्वाची अशी भक्कम ओळख निर्माण करणं, हे खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागातून येऊन वैद्यकीय क्षेत्रात आणि आता विद्यार्थी नेतृत्वात त्यांनी मिळवलेलं हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
डॉ. ज्ञानेश्वर यांचे या घवघवीत यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील उज्ज्वल वाटचालीस माझ्या अनंत शुभेच्छा! तुम्ही अशीच प्रगती करत राहा आणि आपल्या जिल्ह्याचं नाव आणखी मोठं करा! असे डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी सांगितले
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis