
छत्रपती संभाजीनगर, 04 सप्टेंबर (हिं.स.)।
सरकारकडून ठोस निर्णय न झाल्यास आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत सरकारची भूमिका, झालेल्या चर्चेचा आढावा आणि पुढील आंदोलनाची दिशा याबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील चर्चेने वातावरण काहीसे सकारात्मक झाले असले, तरी आंदोलन अद्याप संपलेले नाही. मागण्यांवर अंतिम तोडगा निघेपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याने आता सरकार पुढे कोणता निर्णय घेते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
चर्चेचा मार्ग खुला झाला असला तरी मराठा आरक्षणाच्या मागण्यांवर ठोस निर्णय होणे गरजेचे आहे. त्यामुळे आंतरवाली सराटीतून आता सरकारच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis