छ. संभाजीनगर - आसरा स्कूल, वैराग रोड, धाराशिव विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर
छत्रपती संभाजीनगर, 04 सप्टेंबर (हिं.स.)। आसरा स्कूल, वैराग रोड, धाराशिव येथे आज सर्व विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांची विविध आरोग्य तपासणी करून त्यांना
अ


छत्रपती संभाजीनगर, 04 सप्टेंबर (हिं.स.)। आसरा स्कूल, वैराग रोड, धाराशिव येथे आज सर्व विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांची विविध आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रसंगी संस्थेचे मार्गदर्शक व संस्थापक नासिर खान , माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक खलिफा भाई कुरेशी, नगरसेवक श्री. सुनील आंबेकर, नगरसेवक श्री. अशोक मामा देवकते, मिलिंद आप्पा पेठे, शहर कार्याध्यक्ष श्री. नरसिंह मेटकरी, ॲड. योगेश सोन्ने पाटील डॉ पांढवले सर, डॉ अमृता सरूळककर, डॉ पूजा कापरे,तसेच व्ही.पी. एज्युकेशन कॅम्पसच्या हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर्स व वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांचे आरोग्य हीच समाजाची खरी संपत्ती असून, त्यांच्या निरोगी भविष्यासाठी अशा आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन निश्चितच कौतुकास्पद आहे.असे

डॉ.प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील, जिल्हाध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार,धाराशिव जिल्हा. यांनी सांगितले

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande