छ. संभाजीनगर - म. जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान राबविण्यास मान्यता
छत्रपती संभाजीनगर, 04 सप्टेंबर (हिं.स.)। वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या महसुली दावे आणि अपिलांच्या फेऱ्यांत अडकलेल्या शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना आता आपापसातील तडजोड आणि सहमतीने वाद कायमस्वरूपी मिटविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.महसूल विभागाकडील
छ. संभाजीनगर - म. जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान राबविण्यास मान्यता


छत्रपती संभाजीनगर, 04 सप्टेंबर (हिं.स.)। वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या महसुली दावे आणि अपिलांच्या फेऱ्यांत अडकलेल्या शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना आता आपापसातील तडजोड आणि सहमतीने वाद कायमस्वरूपी मिटविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.महसूल विभागाकडील प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्यासाठी राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने राज्यभर ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ राबविण्यास मान्यता दिली आहे.१ सप्टेंबर २०२६ पासून सुरू झालेले हे अभियान ३१ मार्च २०२७ पर्यंत सात महिने राबविण्यात येणार आहे.

शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचा महसुली दावे व अपिलांसाठी खर्च होणारा वेळ आणि पैसा वाचविणे,तसेच महसूल विभागांतर्गत प्रलंबित असलेली अर्धन्यायिक प्रकरणे आपापसातील तडजोड व सहमतीने जलदगतीने निकाली काढणे,हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.जिल्ह्यात मंडळ अधिकारी,नायब तहसीलदार,तहसीलदार,उपविभागीय अधिकारी,उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), उपजिल्हाधिकारी आणि अपर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयांमध्ये प्रलंबित असलेल्या सर्व प्रकारच्या महसुली दावे आणि अपिलांसंदर्भात हे अभियान राबविण्यात येणार आहे.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande