लातूर - जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न
लातूर, 04 सप्टेंबर (हिं.स.)। आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लातूर पोलीस विभागाच्या वतीने दयानंद सभागृह येथे जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक घेण्यात आली. गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित वातावरणात आणि सामाजिक सलोखा जपत साजरा करण्यासाठी प्रशासन व पोल
पोलीस अधिक्षक अमोल तांबे


लातूर, 04 सप्टेंबर (हिं.स.)। आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लातूर पोलीस विभागाच्या वतीने दयानंद सभागृह येथे जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक घेण्यात आली. गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित वातावरणात आणि सामाजिक सलोखा जपत साजरा करण्यासाठी प्रशासन व पोलीस विभागाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी लातूर जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यंदाचा उत्सव ‘डीजे मुक्त गणेशोत्सव’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले. गतवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवात डीजे व कर्णकर्कश ध्वनिप्रक्षेपण यंत्रणेला परवानगी दिली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गणेशोत्सवाची सांस्कृतिक परंपरा जपत मंडळांनी मिरवणुकांमध्ये लेझीम, ढोल-ताशा, झांज पथक, पारंपरिक वाद्ये, लोककला आणि लोकनृत्यांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. यामुळे उत्सवाला पारंपरिक स्वरूप प्राप्त होण्याबरोबरच स्थानिक कलाकार व कलापथकांनाही रोजगाराची संधी उपलब्ध होईल. लातूर जिल्ह्याने सुसंस्कृत आणि आदर्श गणेशोत्सवाचा ‘लातूर पॅटर्न’ राज्यासमोर निर्माण करावा, असेही त्यांनी सांगितले.

गणेशोत्सवाच्या काळात सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक गणेश मंडळाने आपल्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. ही यंत्रणा गणेशोत्सवानंतरही कायमस्वरूपी कार्यरत ठेवावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.पोलीस आणि गणेश मंडळांमध्ये प्रभावी समन्वय राहावा, यासाठी यंदा ‘एक मंडळ–एक पोलीस अंमलदार’ ही अभिनव संकल्पना राबविण्यात येणार आहे. प्रत्येक गणेश मंडळासाठी नियुक्त करण्यात येणारा पोलीस अंमलदार मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधून गर्दी व्यवस्थापन, मिरवणूक नियोजन, सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेसंदर्भात आवश्यक मार्गदर्शन करणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande