जालन्यात आधुनिक सुविधांनी युक्त ग्रंथालये उभारणार
छत्रपती संभाजीनगर, ४ सप्टेंबर (हिं.स.) : जालना महानगरपालिकेच्या हद्दीत विकसित करण्यात येणारी ग्रंथालये पारंपरिक स्वरूपाची न ठेवता स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, संशोधक आणि नियमित वाचकांच्या गरजांनुसार आधुनिक सुविधांनी सुसज्ज करावीत, अस
जालन्यात आधुनिक सुविधांनी युक्त ग्रंथालये उभारणार


छत्रपती संभाजीनगर, ४ सप्टेंबर (हिं.स.) : जालना महानगरपालिकेच्या हद्दीत विकसित करण्यात येणारी ग्रंथालये पारंपरिक स्वरूपाची न ठेवता स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, संशोधक आणि नियमित वाचकांच्या गरजांनुसार आधुनिक सुविधांनी सुसज्ज करावीत, असे निर्देश पर्यावरण मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. ग्रंथालयांमध्ये स्वतंत्र अभ्यासिका, मुक्त वाचन क्षेत्र, संगणक व लॅपटॉप सुविधा, दूरदर्शन संच, ऑनलाइन मार्गदर्शन तसेच संशोधन विभागाचा समावेश करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

महापालिकेच्या वतीने सुधारित करण्यात येणाऱ्या उद्यानांच्या प्रलंबित निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करून कामांना गती द्यावी. उद्यानांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यासोबतच धूळ व प्रदूषण कमी करणाऱ्या उपाययोजना आणि नागरिकांसाठी आरोग्यदायी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. सर्व प्रकल्पांचे डिझाईन, अंदाजित खर्च, निविदा प्रक्रिया आणि अंमलबजावणीचे वेळापत्रक निश्चित करून कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश मुंडे यांनी दिले.

जालनाई सिल्कला स्वतंत्र ब्रँड ओळख देण्यावर भर

जालनाई सिल्कच्या ब्रँडिंगसंदर्भात सादरीकरण करण्याचे निर्देश देत मुंडे यांनी जालना जिल्ह्यातील या उत्पादनांना स्वतंत्र बाजारपेठीय ओळख निर्माण करून देण्यावर भर दिला. यासाठी तीन ते पाच वैशिष्ट्यपूर्ण डिझाईन निश्चित करावीत. मोसंबी, स्थानिक दगडी जाळी व स्थापत्यशैली तसेच अजिंठा कलाशैलीपासून प्रेरित घटकांचा डिझाईनमध्ये वापर करण्याची शक्यता तपासावी, असे त्यांनी सांगितले.

डिझाईनची संख्या मर्यादित ठेवून ती जालना जिल्ह्याची सहज ओळख बनतील, याकडे विशेष लक्ष द्यावे. ब्रँडिंगसाठी व्यावसायिक सल्लागाराची मदत घेऊन उत्पादनांची गुणवत्ता, कच्चा माल, विणकामासाठी लागणारा कालावधी, कारागिरांची मजुरी, उत्पादनाची किंमत आणि विक्री व्यवस्था यांचा समावेश असलेला सविस्तर व्यवसाय आराखडा तयार करावा, असेही मुंडे यांनी स्पष्ट केले.------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande