छ. संभाजीनर: एशियन हॉस्पिटलमध्ये भीषण आग; 9 चिमुकल्यांसह 58 रुग्ण थोडक्यात बचावले
छत्रपती संभाजीनगर, 04 सप्टेंबर (हिं.स.)।छत्रपती संभाजीनगरमधून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. शहरातील एशियन हॉस्पिटलमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आकाशवाणी चौकातील एशियन हॉस्पिटलमध्ये पहाटे पावणे तीनच्या सुमारास ही आग लागली असल्याची प
छ. संभाजीनर: एशियन हॉस्पिटलमध्ये भीषण आग; 9 चिमुकल्यांसह 58 रुग्ण थोडक्यात बचावले


छत्रपती संभाजीनगर, 04 सप्टेंबर (हिं.स.)।छत्रपती संभाजीनगरमधून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. शहरातील एशियन हॉस्पिटलमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आकाशवाणी चौकातील एशियन हॉस्पिटलमध्ये पहाटे पावणे तीनच्या सुमारास ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, हॉस्पिटलच्या लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात म्हणजेच NICUमध्ये आग लागल्याने एकच खळबळ उडाली असून आगीच्या वेळी NICUमध्ये 9 बालकं उपचार घेत होती. तर एसीच्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आग लागल्याचं समजताच अग्निशमन दल, पोलीस आणि हॉस्पिटल कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केलं. सर्व 9 बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलंय. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. तर यातील 5 बालकांना घाटी रुग्णालयात, 3 बालकांना एमजीएम रुग्णालयात, तर एका बालकाला संजीवनी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय. दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत अवघ्या 10 ते 15 मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवलं. यामुळे आग हॉस्पिटलच्या इतर भागात पसरण्याचा धोका टळला.

__________

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande