शेतकऱ्यांच्या पिकांच्या संरक्षणासाठी शासनाची प्रत्यक्ष कार्यवाही; माकडांच्या उपद्रवावर विशेष मोहीम सुरू
अमरावती, 04 सप्टेंबर (हिं.स.) - धामणगाव विधानसभा मतदारसंघातील माकडांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी आमदार प्रतापदादा अडसड यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्
शेतकऱ्यांच्या पिकांच्या संरक्षणासाठी शासनाची प्रत्यक्ष कार्यवाही; माकडांच्या उपद्रवावर विशेष मोहीम सुरू


अमरावती, 04 सप्टेंबर (हिं.स.) - धामणगाव विधानसभा मतदारसंघातील माकडांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी आमदार प्रतापदादा अडसड यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून, वन विभागाने माकडांना पकडण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे.

शेतकऱ्यांकडून सातत्याने तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आमदार अडसड यांनी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधत आरएफओ व डीएफओ यांना पत्र देऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली. माकडांचा उपद्रव रोखण्यासाठी यापूर्वी शेतकऱ्यांनाच स्वतःच्या खिशातून खर्च करावा लागत होता. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक भार न टाकता शासनाच्या माध्यमातून विशेष पथक पाठविण्याचा पाठपुरावा करण्यात आला.या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत अवघ्या चार दिवसांत वन विभागाचे विशेष पथक धामणगाव रेल्वे शहर, जुना धामणगाव आणि मंगरूळ दस्तगीर परिसरात दाखल झाले असून माकडांना पकडण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या कारवाईमुळे पिकांचे नुकसान रोखण्यास मदत होणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण व त्यांच्या कष्टाचे मोल जपणे ही प्राथमिक जबाबदारी असून, कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी पाठपुरावा सुरू राहील, असे आमदार प्रतापदादा अडसड यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande