
आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ
छत्रपती संभाजीनगर, ४ सप्टेंबर (हिं.स.) : कळंब तालुक्यातील शिराढोण येथे मातंग समाजाच्या स्मशानभूमीत बांधण्यात येणाऱ्या दहन शेडच्या कामाचे भूमिपूजन आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या दहन शेडमुळे मातंग समाजातील नागरिकांना सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होणार आहे.
यावेळी आमदार कैलास पाटील म्हणाले की, सर्व समाजघटकांना सन्मानाने जगण्यासाठी आवश्यक मूलभूत सुविधा मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. अंत्यसंस्कारासारख्या संवेदनशील प्रसंगी नागरिकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही सामाजिक जबाबदारी आहे.
शिराढोण येथील दहन शेडच्या माध्यमातून नागरिकांची महत्त्वाची गरज पूर्ण होणार असून, या सुविधेमुळे अंत्यसंस्काराच्या वेळी होणाऱ्या गैरसोयी दूर होण्यास मदत होईल, असेही आमदार पाटील यांनी सांगितले.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis