छ. संभाजीनगर - किनगाववाडी येथे संत श्री कानिफनाथ महाराज यांची मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 04 सप्टेंबर (हिं.स.)। किनगाववाडी येथे संत श्री कानिफनाथ महाराज यांच्या मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळ्यानिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमास भाजपा आमदार नारायण कुचे उपस्थित होते. यावेळी सामाजिक सभागृहाचे लोकार्पणही संपन्न झाल
छ. संभाजीनगर - किनगाववाडी येथे संत श्री कानिफनाथ महाराज यांची मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा संपन्न


छत्रपती संभाजीनगर, 04 सप्टेंबर (हिं.स.)। किनगाववाडी येथे संत श्री कानिफनाथ महाराज यांच्या मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळ्यानिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमास भाजपा आमदार नारायण कुचे उपस्थित होते.

यावेळी सामाजिक सभागृहाचे लोकार्पणही संपन्न झाले. गावकऱ्यांनी सामाजिक सभागृहाची मागणी केली होती ती पूर्ण केली आहे गावाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून आणखी निधी निश्चितपणे आणला जाईल असे आमदार कुचे यांनी सांगितले. या पवित्र व मंगलमय प्रसंगी संतांच्या चरणी नतमस्तक होऊन सर्वांच्या सुख-समृद्धी, आरोग्य व कल्याणासाठी प्रार्थना केली.

याप्रसंगी गणेश आनंद महाराज महामुनी, अंबड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अवधूत नाना खडके, व्यापारी द्वारकादास जाधव, श्रीराम महेश, हरिश्चंद्र दुर्गासिंग, लागलो होतो, बद्री वाघ, सरपंच विठ्ठल बामनावर, दारासिंग मुऱ्हाडे, नारायण नागलोत, धूराजी गांगे, गणेश गांगे, रूपचंद गांगे, सुनील गांगे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संत कानिफनाथ महाराजांचा आशीर्वाद सर्वांवर सदैव राहो, हीच प्रार्थना त्यांनी केली

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande