
छत्रपती संभाजीनगर, 04 सप्टेंबर (हिं.स.)। गिरसावळीत १०० KV नवीन डीपी मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार अनुराधा चव्हाण यांनी दिली.
आमदार चव्हाण यांनी सांगितले,शेतकरी बांधवांना शेतीसाठी वेळेवर, पुरेशा दाबाने आणि सुरळीत वीज मिळावी, यासाठी सतत पाठपुरावा सुरू होता. याच निरंतर प्रयत्नातून गिरसावळी, ता.फुलंब्री येथील तलाव परिसरासाठी १०० KV क्षमतेची नवीन डीपी (रोहित्र) मंजूर करण्यात आली आहे.तलाव परिसरातील शेतकरी बांधव गेल्या अनेक दिवसांपासून विजेच्या समस्येला तोंड देत होते. ही बाब लक्षात येताच महावितरण प्रशासनाकडे आग्रही मागणी करून ही नवीन डीपी तातडीने मंजूर करून घेतली.नवीन डीपी कार्यान्वित झाल्यामुळे परिसरातील कृषी पंपांचा अतिरिक्त भार कमी होऊन शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने अखंडीत वीजपुरवठा मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.बळीराजाचा सिंचनाचा आणि शेतीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवल्याबद्दल गिरसावळी येथील सर्व ग्रामस्थ आणि शेतकरी बांधवांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.. एक लोकप्रतिनिधी म्हणून हे माझे कर्तव्य असून यापुढेही जनतेची सेवा अशाच पद्धतीने सुरू राहील..
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis