
बीड, 04 सप्टेंबर (हिं.स.)। पट्टी तांडा (सिमरी पारगाव) येथे संत सेवालाल महाराज सभागृहाचे अनावरण तसेच संत सेवालाल महाराज व आई जगदंबा देवी मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यास उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला
संत सेवालाल महाराजांच्या पवित्र विचारांनी आणि आई जगदंबा देवीच्या भक्तिमय वातावरणाने मन अक्षरशः तल्लीन झाले. या पवित्र सोहळ्याचा साक्षीदार होता आल्याचा मनस्वी आनंद आहे.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून पट्टी तांड्याचे रहिवासी तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी VJNT सेलचे प्रदेशाध्यक्ष रविकांत राठोड, निळकंठ भोसले, सरपंच छगन कांबळे, उपसरपंच सय्यद तय्यब, आबाजी भोसले, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख अंबादास राठोड, माजी सरपंच होनाजी राठोड, शिवाजी राठोड, देविदास राठोड, नारायण राठोड, बाबासाहेब पवार यांच्यासह ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संत सेवालाल महाराज व आई जगदंबा देवीच्या चरणी नतमस्तक होऊन सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis