श्रावण मासानिमित्त किनवटमध्ये साईबाबा पालखी शोभायात्रेचा उत्साहात समारोप
नांदेड, 04 सप्टेंबर (हिं.स.)। श्रावण मासानिमित्त येथील किनवट येथे पैनगंगा तीरावरील साईबाबा मंदिरात साई दीक्षा धारी भाविकांनी किनवट शहरातून साईबाबा प्रतिमेची पालखी शोभायात्रा काढण्यात आली किनवट शहराच्या प्रमुख मार्गावरून निघालेल्या या शोभायात्रेचे
श्रावण मासानिमित्त किनवटमध्ये साईबाबा पालखी शोभायात्रेचा उत्साहात समारोप


नांदेड, 04 सप्टेंबर (हिं.स.)। श्रावण मासानिमित्त येथील किनवट येथे पैनगंगा तीरावरील साईबाबा मंदिरात साई दीक्षा धारी भाविकांनी किनवट शहरातून साईबाबा प्रतिमेची पालखी शोभायात्रा काढण्यात आली किनवट शहराच्या प्रमुख मार्गावरून निघालेल्या या शोभायात्रेचे शहरवासीयांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले तर विठ्ठलेश्वर मंदिर श्रीराम मंदिर हनुमान मंदिर वगजानन महाराज मंदिरात पूजा आरती करण्यासाठी ही शोभा यात्रा विसावली होती तर साईबाबा मंदिरात या शोभायात्रेचा समारोप झाला.

श्रीसाईबाबा मंदीर संस्थानचे विश्वस्थ सच्चिदानंद पवार गुरु स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट शहरातील युवकांनी माल धारणा करून २१ दिवसापासून दीक्षा घेतली. दररोज सकाळी थंड पाण्याचे स्नान करून साईबाबाची महापूजा आरती करण्यात आली आणि या दीक्षा व्रताचा समारोप ही सेवा धारी भक्त शिर्डी येथे साईबाबाच्या समाधीचे दर्शन घेऊन होणार आहे शोभायात्रे नंतर साईबाबा मंदिरात महाआरती व पूजा करून महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आला. या संस्थांनचे विश्वस्थ सचीतांनद पवार स्वामी हे वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात आरोग्य महा शिबिर, विविध आरोग्य शिबिर राबविले जातात त्यातच साईबाबा मंदिरात रक्त दान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात अनेक साइ भक्तांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली प्रति वर्षाप्रमाणे यावर्षी या साईबाबा दीक्षा कार्यक्रमात युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता. शिर्डी येथे जाऊन साईबाबाचे दर्शन घेतल्यानंतर या व्रताचा समारोप होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande