छ. संभाजीनगर - २९ सप्टेंबरला दहा ठिकाणी ‘रोजगार महाकुंभ - महाराष्ट्र’ चे आयोजन
छत्रपती संभाजीनगर, 04 सप्टेंबर (हिं.स.)। राज्यातील युवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता,कौशल्य आणि क्षमतेनुसार रोजगाराच्या अधिकाधिक संधी स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी मंगळवार,२९ सप्टेंबर २०२६ रोजी धाराशिव जिल्ह्यात दहा ठिकाणी ‘रोजगार महाकुं
छ. संभाजीनगर - २९ सप्टेंबरला दहा ठिकाणी ‘रोजगार महाकुंभ - महाराष्ट्र’ चे आयोजन


छत्रपती संभाजीनगर, 04 सप्टेंबर (हिं.स.)। राज्यातील युवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता,कौशल्य आणि क्षमतेनुसार रोजगाराच्या अधिकाधिक संधी स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी मंगळवार,२९ सप्टेंबर २०२६ रोजी धाराशिव जिल्ह्यात दहा ठिकाणी ‘रोजगार महाकुंभ- महाराष्ट्र’ (पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा) आयोजित करण्यात येणार आहे.

या रोजगार महाकुंभात जिल्ह्यातील जास्तीत जास्त आस्थापना आणि उद्योजकांनी सहभागी होऊन उपलब्ध रिक्त पदांची माहिती नोंदवावी,असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय गुरव यांनी केले आहे.देशातील युवकांना रोजगार,स्वयंरोजगार, कौशल्य विकास आणि उद्योजकतेच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला अनुसरून महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राज्यभर एकाच दिवशी ५०० रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.

राज्यातील युवकांना त्यांच्या जिल्ह्यात अथवा परिसरातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे,उद्योगांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे तसेच शासन,उद्योग-आस्थापना आणि रोजगार इच्छुक युवक यांना एका सामायिक व्यासपीठावर आणणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

राज्यातील युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता,कौशल्य व क्षमतेनुसार रोजगाराच्या अधिकाधिक संधी स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी ‘रोजगार महाकुंभ’ आयोजित करण्यात येत आहे.या कार्यक्रमाचा भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व आस्थापना आणि उद्योगांनी त्यांना आवश्यक असलेल्या पुरुष व महिला उमेदवारांच्या रिक्त पदांची माहिती नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहेत.

त्यानुसार जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,धाराशिव कार्यालयामार्फत पात्रताधारक बेरोजगार व नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्ह्यातील दहा ठिकाणी ‘रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र’ घेण्यात येणार आहे.

या खालील दहा ठिकाणी होणार रोजगार महाकुंभ

भाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धाराशिव,शिक्षणमहर्षी रा.ना.आलुरे गुरुजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तुळजापूर,संतश्रेष्ठ गोराबा काका शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,कळंब,आचार्य विद्यासागरजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भूम

शासकीय तंत्रनिकेतन, धाराशिव, शिक्षणमहर्षी गुरुवर्य आर.जी.शिंदे महाविद्यालय,परंडा, श्री.छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा,

भानुदासराव चव्हाण महाविद्यालय, लोहारा, आर्ट, सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालय, नळदुर्ग आणि पवनराजे निंबाळकर खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था,गोवर्धनवाडी, ता. व जि.धाराशिव येथे होणार आहे.

रिक्त पदांची माहिती https://forms.gle/Mrz८Gc३ofqq३७wwr६ या लिंकद्वारे ऑनलाइन नोंदविण्याची सुविधा जिल्ह्यातील आस्थापना, उद्योग समूह आणि व्यावसायिकांनी त्यांच्याकडे आवश्यक असलेल्या पुरुष व महिला उमेदवारांच्या माहिती भरावी.या नोंदणीच्या माध्यमातून रोजगार मेळाव्यात आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, धाराशिव येथे कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्रमांक ०२४७२- २९९४३४ वर संपर्क साधावा.

जिल्ह्यात होणाऱ्या या ‘रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र’ (पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा) उपक्रमात जास्तीत जास्त आस्थापना आणि उद्योजकांनी सहभागी व्हावे,असे आवाहन सहायक आयुक्त संजय गुरव यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande