शिव शारदा मल्टीस्टेटच्या तलवाडा शाखेचा दहावा वर्धापन दिन उत्साहात
बीड, ४ सप्टेंबर (हिं.स.) : श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून शिव शारदा मल्टीस्टेटच्या तलवाडा शाखेचा दहावा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाखेतील कर्मचारी, सभासद, कर्जदार आणि खातेदारांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभे
अ


बीड, ४ सप्टेंबर (हिं.स.) : श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून शिव शारदा मल्टीस्टेटच्या तलवाडा शाखेचा दहावा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाखेतील कर्मचारी, सभासद, कर्जदार आणि खातेदारांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. गेल्या दहा वर्षांच्या वाटचालीत मिळालेल्या सहकार्याबद्दल खातेदार व सभासदांचे आभार मानण्यात आले.

कार्यक्रमास डॉ. मराठे, नजीरभाई कुरेशी, गोपाळराव यादव, दिनकर पघळ, मिरगावचे सरपंच झाकणे, सुभाषदादा मस्के, गणपतराव नाटकर, प्रल्हादराव लाड, राजापूरचे सरपंच गवले, बप्पासाहेब पंडित, अजुशेट सौदागर, बद्रीनाथ नाटकर, हरिभाऊ फलके, उद्धवराव फलके आदी मान्यवर उपस्थित होते.

गेल्या दहा वर्षांच्या यशस्वी वाटचालीत प्रत्येक खातेदाराने दिलेली साथ, विश्वास आणि सहकार्य हीच संस्थेची खरी ताकद असल्याचे यावेळी सांगण्यात आले. हा विश्वास भविष्यातही कायम राहावा आणि शिव शारदा मल्टीस्टेटची प्रगतीची वाटचाल अधिक भक्कम व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

वर्धापन दिनानिमित्त शाखेच्या वतीने सभासद, खातेदार, कर्जदार आणि कर्मचारी यांचे आभार मानत संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande