श्री परमेश्वर देवस्थान येथे शिवपुराण कथेला उत्साहात सुरुवात
नांदेड, 04 सप्टेंबर (हिं.स.)। पवित्र श्रावण महिन्याचे औचित्य साधून हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटी (वाढोणा) यांच्या वतीने परमपूज्य श्री प्रेममूर्ती ह.भ.प. जगदीशानंदजी महाराज शास्त्री यांच्या मधुर वाणीतून भव्य संगीतमय श्री शिव
श्री परमेश्वर देवस्थान येथे शिवपुराण कथेला उत्साहात सुरुवात


नांदेड, 04 सप्टेंबर (हिं.स.)।

पवित्र श्रावण महिन्याचे औचित्य साधून हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटी (वाढोणा) यांच्या वतीने परमपूज्य श्री प्रेममूर्ती ह.भ.प. जगदीशानंदजी महाराज शास्त्री यांच्या मधुर वाणीतून भव्य संगीतमय श्री शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सप्ताहात सुरू झालेल्या या शिवपुराण कथेदरम्यान हिमायतनगर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी परमेश्वर मंदिरात उपस्थित राहून ह.भ.प. जगदीशानंदजी महाराज शास्त्री यांचे शुभ आशीर्वाद घेतले व तसेच त्यांनी काही काळ कथा श्रवण करून धार्मिक कार्यक्रमाचा

आनंद घेतला.

यावेळी श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटीचे उपाध्यक्ष महावीर शेठ श्रीश्रीमाळ व संचालक विलास वानखेडे यांच्या वतीने पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. श्रावण महिन्यात श्री परमेश्वर देवस्थान येथे दर्शनासाठी दररोज मोठ्या संख्येने भाविक येत आहेत. विशेषतः धार्मिक कार्यक्रमांच्या काळात मंदिर परिसरात होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसरासह शहरातील विविध ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला

श्री परमेश्वर देवस्थान येथे आयोजित करण्यात आलेली ही संगीतमय शिवपुराण कथा ९ सप्टेंबरपर्यंत भाविकांना श्रवण करता येणार असून या कथेच्या माध्यमातून भगवान शिवाच्या भक्तीचा व आध्यात्मिक विचारांचा संदेश सर्व भाविकांपर्यंत पोहोचत आहे त्यामुळे ही कथा श्रवण करण्यासाठी जास्तीत जास्त भाविकांनी दर रोज २ ते ५ या वेळेत मंदिरात येऊन कथेचा लाभ घ्यावा असे आव्हान मंदिर कमिटी कडून करण्यात आले आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande